_व्याहाड बुज.येथे तान्हापोळा निमित्ताने मा.खा.अशोकजी नेते यांच्याकडून बालगोपालांना खाऊचे वाटप….._

62

_व्याहाड बुज मुराड येथे तान्हा पोळा भजन दिंडीसह मोठया आनंदोत्सवात साजरा_

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिं. ३ सप्टेंबर २०२४

 

सावली:- सावली तालुक्यातील व्याहाड बुज .मुराड येथे दरवर्षी प्रमाणे हिंदु संस्कृतीच्या परंपरेनुसार श्री. पुराणी भजन मंडळ, व्याहाड बुज येथील भजणी ढोलकीच्या तालातील दिंडीसह गावातील नंदीबैल वाजत गाजत एकत्रित करित श्री. संत गजानन महाराज मंदिर तसेच हनुमान मंदिर या ठीकाणी गावातील नागरिक बंधू भगिनी एकत्रीतपणे गोळा होऊन भजनी दिंडीसह हर हर महादेव च्या गजरात तान्हा पोळा (नंदीबैलपोळा) मोठया आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो.

 

या तान्हा पोळ्याच्या शुभपर्वावर सर्व नंदीबैल धारक बालगोपालांना माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांच्याकडून तसेच खासदार महोदयांचे सोशल मिडिया प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य व्या.बु.चे दिवाकर गेडाम यांच्या सहकार्याने प्रत्येक नंदी धारक बालगोपालांना खाऊचे वाटप करण्यात आले.

 

याप्रसंगी मा.खा.नेते यांनी समस्त जनतेला तान्हा पोळा व येणाऱ्या गणेश चतुर्थी च्या हार्दीक सुभेक्षा दिले.