- ग्लोबल गडचिरोली न्यूज
- गडचिरोली, ता.१० : जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दोघेजण रविवारी ८ सप्टेंबर रोजी बोटीच्या साहाय्याने गुंडेनुर नाला ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात बोट उलटली. तुडुंब भरलेल्या नाल्यातून एकजण कसेबसे बाहेर पडला तर दुसरा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. दोन दिवसांनंतर गावकऱ्यांनी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह शोधण्यासाठी गेले असता तो तुडुंब भरलेल्या नाल्याच्या मधोमध झाडावर अडकून होता. गावकऱ्यांना पाहून त्याने जोराचा आवाज देताच गावकऱ्यांनी धाव घेत त्याला सुरक्षित बाहेर पडलो काढले. दलसु अडवे पोदाडी असे त्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचे नाव असून दोन रात्र एक दिवस असा ३६ तास झाडावर अडकून होता.
- प्राप्त माहितीनुसार भामरागड तालुक्यातील लाहेरी पलीकडील बहुतांश गावे पावसाळ्यात संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतात. लाहेरीवरून ४ किलोमीटर अंतरावर गुंडेनुर गाव आहे. त्या पलीकडे अजून डझनभर गावांचा समावेश आहे. लाहेरी आणि गुंडेनूर या दोन गावांच्या मधोमध एक मोठा नाला वाहतो. हा नाला मोठा असून पावसाळ्यात या नाल्याला नदीचे स्वरूप येत असते. या भागातील आदिवासींना शेतीसाठी खते, जीवनावश्यक वस्तू, आठवडी बाजार तसेच विविध कार्यालयीन कामासाठी लाहेरी आल्याशिवाय पर्याय नाही. लाहेरीवरूनच पुढील प्रवास सुरु होतो. दरवर्षी पावसाळ्यात या नाल्यातुन बोटीच्या साहाय्याने किंवा कंबरभर पाण्यातून जलप्रवास करताना अनेकांचे जीव गेले आहेत. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू केले मात्र पावसाळा असल्याने बांधकाम थांबले आहे. त्यामुळे या भागातील आदिवासी लाकडी बोटीच्या सहाय्यानेच ये-जा करतात. रविवारी लाहेरी येथील आठवडी बाजार करून सायंकाळच्या सुमारास गुंडेनूर येथील विलास पुंगाटी आणि दलसु पोदाडी हे दोघे गरिकांची अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू केले मात्र पावसाळा असल्याने बांधकाम थांबले आहे. त्यामुळे या भागातील आदिवासी लाकडी बोटीच्या सहाय्यानेच ये-जा करतात. रविवारी लाहेरी येथील आठवडी बाजार करून सायंकाळच्या सुमारास गुंडेनूर येथील विलास पुंगाटी आणि दलसु पोदाडी ही दोन इसम आपल्या गावाकडे जाण्यासाठी लाकडी बोटीने गुंडेनुर नाला ओलांडत होते. अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन बोट तुडुंब भरलेल्या नाल्यात उलटली. त्यातील विलास पुंगाटी हा कसेबसे पाण्याच्या प्रवाहातून पोहत पोहत बाहेर पडला. मात्र, दलसु अडवे हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. विलासने आपला गुंडेनुर गाव गाठल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ सप्टेंबर रोजी गावातील लोकांना आपबिती सांगितली. मात्र, रविवारपासून या भागात प्रचंड पाऊस आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत असल्याने दलसू अडवे पोदाडी याचा जीव गेला असणार असे गावकऱ्यांना वाटले . मंगळवारी पावसाने विश्रांती घेताच गावकऱ्यांनी सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह शोधायला बाहेर पडले. गुंडेनूर नाल्याजवळ शोधमोहीम राबवित असताना तुडुंब भरलेल्या नाल्याच्या मधोमध एक झाडावरून जोराचा आवाज आला. तेव्हा दलसू हा जिवंत असल्याचे गावकऱ्यांना कळताच त्यातील काही नागरिकांनी परत गाव गाठून बचाव साहित्य आणून तुडुंब भरलेल्या नाल्यातून तब्बल दीड ते दोन तास प्रयत्न करत त्याला बाहेर काढले.विशेष म्हणजे रविवार पूर्ण रात्र, सोमवार दिवस आणि रात्र असे तब्बल ३६ तास किर्र जंगलातील तुडुंब भरलेल्या नाल्यात दलसू न जेवता, न पाणी पिता झाडावर जिवंत होता. अजूनही या भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. दलसूला तुडुंब भरलेल्या नाल्यातून बाहेर काढताना गावकर्यांची मोठी तारांबळ उडाली. त्याला वाचविण्यासाठी अख्ख गाव पाण्यात उतरला होता.
- या भागातील आदिवासींना हा नाला पार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. लाहेरी पलीकडील गावांत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील अश्याच परिस्थितीचा सामना करावा लागतो. या नाल्यात या भागातील अनेक नागरिकांचे जीव गेले आहे. दरवर्षी दिवाळी नंतर पाण्याचा प्रवाह कमी होताच या भागातील आदिवासी बांधव श्रमदानातून बांबूच्या ताटव्यांचा पूल तयार करून ये-जा करतात. मागील काही वर्षांपूर्वी दलसूचे वडील अडवे देखील याच नाल्याच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र सुदैवाने मुलगा या संकटातून बाहेर पडला आहे.
- ———————