ग्रामसभांच्या सक्षमीकरणासाठी राजकीय नेतृत्वाची गरज आमदार डॉक्टर देवरावजी होळी

74

फुलबोडी तालुका धानोरा येथे आदिवासी समाज मेळावा संपन्न

 

सामाजिक नेतृत्वाला राजकीय नेतृत्वाची जोड देण्याची आवश्यकता

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक १८ सप्टेंबर गडचिरोली

 

गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामसभा कार्य करीत आहे. परंतु आजही आपल्या जिल्ह्यातील ग्रामसभांचे सक्षमीकरण होऊ शकले नाही त्यामुळे त्यामुळे ग्रामसभांचे सक्षमीकरण करणे आवश्यक असून ग्रामसभांच्या सक्षमीकरणासाठी राजकीय नेतृत्वाची गरज असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी फुलबोडी गट्टा येथे आयोजित आदिवासी मेळाव्याच्या प्रसंगी केले.

 

आदिवासी समाज बांधव व आमदार डॉक्टर देवरावजी होळी मित्र परिवाराच्या वतीने खुटगाव इलाका परिसरातील आदिवासी बांधवांचा मेळावा फुलबोडी येथे आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला प्रामुख्याने फुलबोडी सरपंच मंगला करंगामी, पैकूजी पा. परसे, दशरथ पा. पुंगाटी, मंगुजी पदा, चातगाव सरपंच गोपाल उईके, ताणूजी कल्लो, सोमाजी परसे, सीमा करंगामी, मणिराम परसे, बाजीराव उसेंडी, राजू करगामी, प्रकाश पदा, धर्मा करगामी, अनिल तुमरेटी, प्रामुख्यानं मंचावर उपस्थित होते.

 

यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले की, ग्रामसभातील सामाजिक नेतृत्वाला राजकीय नेतृत्वाची जोड देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. त्यात ग्रामसभांचे हित असून ग्रामसभांचे सक्षमीकरण होण्यास मदत मिळेल यादृष्टीने ग्रामसभांनी काम करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. मेळाव्याला परिसरातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली