गडचिरोली शहरातील स्नेहनगरात घरफोडी

337

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २८ : शहरातील भरगच्च लोकवस्ती असलेल्या स्नेहनगर परीसरात शुक्रवार (ता.२७) रात्री चोरट्यांनी दरवाजा तोडून घरफोडी केली.

स्नेहनगर येथे राहणारे मोहनदास मेश्राम यांची मुलगी मुंबईत राहते.ते काही दिवसांसाठी मुलीकडे मुंबईला गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी शुक्रवारी रात्री लोखंडी पहारीने त्यांच्या घराचा दरवाजा तोडला. तसेच घराच्या आत असलेले दरवाजेही तोडले. आलमारी, दिवाण पलंग आदींची मोडतोड करून साहित्य अस्ताव्यस्त केले. विशेष म्हणजे यापूर्वीसुद्धा मोहनदास मेश्राम यांच्याकडे घरफोडी झाली होती. तेव्हा आठ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले होते. मागील घटना लक्षात घेत त्यांनी घरात सोने किंवा पैसे ठेवले नव्हते. त्यामुळे चिडलेल्या चोरट्यांनी घरातील साहित्याची मोडतोड करून साहित्य अस्ताव्यस्त केले. शनिवारी सकाळी त्यांच्याकडे काम करणारा मुलगा घरी आला तेव्हा घरफोडी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने मोहनदास मेश्राम यांना कळविले. त्यांनी यासंदर्भात गडचिरोली शहर पोलिस स्टेशनला माहिती दिल्यानंतर पोलिसांनी येऊन पाहणी केली व तक्रार नोंदवून घेतली. स्नेहनगर येथील मोहनदास मेश्राम यांचे घर गडचिरोली-धानोरा राष्ट्रीय महामार्गापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. या परीसरात बरीच घरे आहेत. असे असतानाही एकदा नव्हे, तर दोनदा त्यांच्याकडे घरफोडी झाली. मागील काही दिवसांपासून शहरात घरफोडी,चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. प्रकरणाचा तपास गडचिरोली पोलिस करत आहेत.

————————