दसरा उत्सवानिमित्त होणार रावणाचे दहन

55

गडचिरोली, ता. ११ : दसरा उत्सव समितीच्या वतीने शनिवार (ता. १२) सायंकाळी ६ वाजता शहरातील स्थानिक शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्

रारंभी दसरा समितीच्या नेतृत्वात शनिवारी दुपारी ४ वाजता शहरातील स्थानिक राममंदिर रामपुरी वॉर्ड येथून शोभयात्रा काढून नगर परिषद गडचिरोली ते शिवाजी कला महाविद्यालय प्रांगणात समारोप करण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता भव्य रावण दहन कार्यक्रम पार पडेल. या उत्सवात बहुसंख्य नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन रावण दहन दसरा उत्सव समितीचे रामायण खटी, नीतेश खडसे, श्रीकांत भृगवार, दिलीप दडवे, हर्षल गेडाम, रोशन आखाडे, अमित हेमके, सुभाष उपलवार, विकी कोवे, अरविंद आत्राम, राजू टेकाम यांनी केले आहे.

—————————————