- गडचिरोग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, : प्रभू श्रीरामाने दशानन रावणाचा वध केला तो दिवस अर्थात विजयादशमी किंवा दसरा देशासह गडचिरोलीतसुद्धा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हजारो हिंदू बांधवांच्या भरगच्च उपस्थितीत रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यातआले. दसरा हा केवळ एक सण नाही तर हा एक असा प्रसंग आहे जेव्हा आपणा सर्वांना वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश मिळतो. हा सण प्रभू श्रीराम यांनी रावणावर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. दसरा हा सण ज्याला विजयादशमीदेखील म्हणतात, भारतात दरवर्षी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. दसरा हा सण शतकानुशतके जुना असून त्याला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. देशासह गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. यंदाही हा सण रावणदहन करत आनंदाने साजरा करण्यात आला. या या कार्यक्रमात कार्यक्रमाचे आयोजक रामायण खटी, आमदार डाॅ. देवरावजी होळी, माजी खासदार अशोकजी नेते, नीतेश खडसे, ,श्रीकांत भृगवार, दिलीप दडवे, हर्षल गेडाम, रोशन आखाडे, अमित हेमके, सुभाष उप्पलवार, विकी कोवे, अरविंद आत्राम, राजू टेकाम नियोजन समितीचे सर्व पदाधिकारी तसेच हजारोच्या संख्येने हिंदू समाजबांधव उपस्थित होते. ——————————————ली येथील रावण दहन हजारो हिंदू बांधवाच उपस्थितीत उत्साहात.