ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली,(जिमाका),दि.9: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रीक निवडणूक 2024 चे अनुषंगाने 67-आरमोरी विधानसभा मतदारसंघात अत्यावश्यक सेवेतील मतदार, पोलीस, होमगार्डस् व मतदान पथकांतील मतदारांचे पुढील दिनांकास स्थळी व वेळी मतदान पार पडणार आहे.
मतदारांचा प्रकार – पोलिस व होमगार्ड सेवेतील मतदार, मतदानाची तारीख 11 ते 13 नोव्हेंबर 2024, मतदानाची वेळ ही स.10.00 ते सायं. 5.00 वा. पर्यंत असेल. मतदानाचे ठिकाण हे महसुल मंडळ देसाईगंज.
मतदान पथक व निवडणूक कर्तव्यार्थ मतदार यांचेसाठी मतदानाची तारीखी ही 13 ते 14 नोव्हेंबर 2024, स.10.00 ते सायं 5.00 वा. पर्यंत असेल. मतदानाचे ठिकाण- आदर्श ईग्लिश हॉयस्कुल देसाईगंज.
अत्यावश्यक सेवेतील मतदार यांची मतदानाची तारीखी ही 14 ते 15 नोव्हेंबर 2024 असेल. मतदानाची वेळ ही स.10.00 ते सायं. 5.00 वा. पर्यंत, स्थळ- महसुल मंडळ देसाईगंज.
मतदान पथक व निवडणूक कर्तव्यार्थ मतदार यांची मतदानाची तारीख ही 17 ते 19 नोव्हेंबर 2024 रोजी स. 7.30 ते सायं. 5.00 वा. पर्यंत व मतदानाचे ठिकाण हे ईव्हीएम सुरक्षा कक्ष, वखार महामंडळाचे गोदाम आरमोरी रोड देसाईगंज येथे असेल.
तरी उपरोक्त प्रमाणे अत्यावश्यक सेवेतील मतदार, पोलीस, होमगार्डस् व मतदान पथकांतील मतदार यांनी नोंद घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावण्याच्या सुचना देण्यात आल्या असुन, उक्त दिनांकास उमेदवार अथवा त्यांचे प्राधिकृत केलेले निवडणूक मतदान प्रतिनिधी यांनी उपस्थित राहणेबाबत मानसी (भा.प्र.से.) निवडणूक निर्णय अधिकारी 67-आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांनी कळविलेले आहे.