विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला ०२चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण १२,०५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

96

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दि,१३/११/२०२४

आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४च्या मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याकरीता ब­याच दारुविक्रेत्यांकडून छुप्या मार्गाने शेजारील चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्रातून गडचिरोली जिल्ह्रात अवैद्य दारु पुरवठा करून जिल्ह्राच्या विविध भागात पोहचविण्याची दाट शक्यता असते. त्याद्वारे मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकुण निवडणुक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यात अडथळा निर्माण होत असते.

 

स्थानिक गुन्हे शाखेची चमू आगामी निवडणुक २०२४ च्या पाश्र्वभुमिवर गडचिरोली परिसरात गस्त करीत असतांना दिनांक १२/११/२०२४ रोजी गोपनिय सुत्रांकडुन माहिती मिळाली की, गडचिरोली शहरातील गोकुळनगर परिसरातील अवैद्य दारु विक्रेता नामे आकाश भरडकर हा त्याचा साथीदार नामे रोशन लोखंडे याच्या मदतीने मौजा ब्राम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर येथून गडचिरोली परिसरात अवैद्य देशी व विदेशी दारुची वाहतुक करून आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या पाश्र्वभुमीवर मनोज मुजुमदार व क्रिष्णा मुजुमदार यांना पुरवठा करणार आहे.

 

सदर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने पोरेड्डीवार इंजिनिअरींग कॉलेज, बोदली परिसरात सापळा रचून असतांना खबरेतील दोन वाहने समोरून येतांना दिसताच त्यांना थांबवून वाहनांची तपासणी केली असता, त्यात रॉकेट देशी दारुचे १३०खरड¬ांचे बॉक्स मिळून आले. सदर दारुचे बॉक्स व दारु वाहतुकीकरीता वापरलेले चारचाकी वाहन असा एकुण १२,०५,००० रु. चा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करून वाहनातील आरोपी नामे आकाश भाऊराव भरडकर, रा. गोकुळनगर, रोशन हरिदास लोखंडे, रा. उंदरी, ता. उमरेड, जि. नागपूर यांना अटक करून त्यांचे व पाहिजे असलेले आरोपी नामे मनोज मुजुमदा, रा. एटापल्ली व क्रिष्णा मुजुमदार, रा. कसनसुर यांचे विरुद्ध पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

 

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुक – २०२४ अवघ्या आठ दिवसांवर येवून ठेपली असतांना स्थानिक गुन्हे शाखेने १३०देशी दारुचे बॉक्स व वाहने जप्त केल्याने कसनसुर व एटापल्ली सारख्या दुर्गम भागात निवडणुक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यास मोलाचा हातभार लागणार आहे.

 

सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि. राहुल आव्हाड यांचे नेतृत्वात पोअं/ प्रशांत गरफडे, नामदेव भटारकर, चापोअं/दिपक लोणारे यांनी केले

ली आहे.