आचारसंहितेदरम्यान कारवाई करून जप्त केला लाखोंचा मुद्देमाल

72

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, दि. १६ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक कालावधीत जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिल्या होत्या. त्यासानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनात राज्य उत्पादन शुल्क विभागाने निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत जिल्हात आतापर्यंत २३ गुन्हे नोंदविले आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईत २२आरोपीना अटक, ३ वाहने, १६५ लिटर देशी दारू, २३५ लिटर हातभट्टी दारू, २ लिटर विदेशी दारू व ६ लिटर इतर राज्यातील दारू जप्त केली असून २९००लिटर सडवा नष्ट केला आहे. जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत तीन लाख ६० हजार इतकी आहे.

यासोबतच छत्तीसगढ व तेलंगणा राज्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत बैठक घेवून त्या राज्यातील सीमावर्ती भागात निवडणुकीच्या आधी, निवडणूकीच्या दिवशी व मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. पोलीस विभाग, वन विभाग, आर.टी.ओ., जी.एस.टी. आणि शेजारील जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने आवश्यक तेथे नियमित व तात्पुरते सिमा तपासणी नाके उभे करण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १० तपासणी नाके उभे केले आहेत, गडचिरोलीच्या सीमेवर चंद्रपूर जिल्ह्याने ९ तपासणी नाके, नागपूर जिल्ह्याने २, भंडारा जिल्ह्याने१ व गोंदिया जिल्ह्याने २तपासणी नाके उभे केले आहेत. तसेच छत्तीसगढ राज्याने २ तपासणी नाके, तेलंगणा राज्याने २ तपासणी नाके उभे केले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत १८ सराईत गुन्हेगारकडून कलम ९३ अंतर्गत चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्र घेण्यात आले आहे तसेच कलम १६८अंतर्गत ३५जणंना अवैध दारू निर्मिती, विक्री, वाहतूक आदीमध्ये सहभागी झाल्याचे आढळल्यास कारवाईची नोटिस दिली आहे.