ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ५ : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसेच अजित पवार व एकनाथजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या महाशपथविधी सोहळ्याचे औचित्य साधून गुरुवार (ता. ५) भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या अध्यक्षतेत ढोल-ताशाच्या गजरात गुलाल उधळत फटाक्यांच्या आतषबाजी करून व एकमेकांना मिठाई देत स्थानिक इंदिरा गांधी चौकामध्ये जल्लोष केला.
याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान मोर्चा प्रदेश सचिव तथा ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, सुधाकर यनगंदलवार, कोषाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते गजानन यनगंदलवार, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, प्रशांत भृगुवार, अनिल करपे, देवाजी लाटकर, प्रा. उराडे, सुधाकर पेटकर, संजय बारापात्रे, दात्तू माकोडे, मंगेश रणदिवे, मधुकर भांडेकर, हर्षल गेडाम, सत्याजित सरदार,वैष्णवी नैताम, भारती खोब्रागडे, भूमिका बर्डे, बेबीबाई चिचघरे, पल्लवी बारापात्रे, नीता उंदीरवाडे, सोनिया उईके, त्रिशा डोईजड तसेच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोर्चा व युवा मोर्चा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————–