ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १०: बांग्लादेशमध्ये हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन आदी अल्पसंख्याक समाजाच्या ,धर्माच्या लोकांवर होत असलेल्या अमानवीय अत्याचाराविरोधात आज १० डिसेंबर रोजी गडचिरोली शहरात सकल हिंदू समाजातर्फे विशाल न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या न्याय यात्रेत हिंदू बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघ चालक घिसुलालजी काबरा, माजी आमदार डाॅ. देवराव होळी , प्राचार्य डाॅ. लालसिंह खालसा , खरवडे ताई , प्रमुख मार्गदर्शक भानारकर , इस्काॅनचे परमेश्वर दास महाराज, मुरलीधर महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,विश्व हिंदू परिषद ,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , नारीशक्ती संघटना, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंगाली समाजाचे, सिंधी समाजाचे प्रतिनिधी आणि सदस्य , विविध जाती, संघटनेचे पदाधिकारी ,सदस्य आणि बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते. ही न्याय यात्रा शिवाजी महाविद्यालयातून देवकुले पटांगणातपर्यंत काढण्यात आली. देवकुले पटांगणात मान्यवरांकडून प्रबोधन करण्यात आले. प्राचार्य डाॅ. खालसा म्हणाले की, शिख धर्माच्या धर्मगुरूंनी आपल्या धर्माच्या रक्षणासाठी अनेक बलिदाने दिली, पण त्यांनी आपल्या धर्माचा त्याग केला नाही. इस्काॅनचे परमेश्वर महाराज म्हणाले की, बांग्लादेशाच्या विभाजनाच्या(मुक्ती संग्रामाच) वेळेस तिथे स्वतः बांगलादेश मधे असल्याने आपल्या डोळ्यासमोर हिंदू लोकांवर किंवा महिलांवर जे अतोनात अत्याचार झाले ते आपण पाहिले असल्याचे सांगितल.आतासुद्धा सतत अमानवीय अत्याचार तिथले महिलांवर ,मुलींवर सुरू आहेत.आज जर आपण भारताचे लोक बांगलादेशी हिंदूंना मदत नाही केलं ,तर बांगलादेश मधली हिंदू पूर्णपणे समाप्त होऊन जाणार .आज शेजार च घर जळत आहे उदया आपला पण घर जळायला वेळ लागणार नाही.म्हणून आपण सर्व भारताचे लोक बांग्लादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहून सरकारला त्यांना मदत करण्याची विनंती करायला पाहिजे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी दैने यांच्यामार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठवण्यात आले.
———————————