न्यायाधीशांच्या पोलिस गार्डने न्यायालयाच्या आवारातच स्वतःवर झाडली बंदुकीची गोळी

188

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ११ : गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात बुधवार ११ डिसेंबर रोजी दुपारी अंदाजे ३ वाजताच्या सुमारात न्यायाधीशांच्या सुरक्षा बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पोलिस गार्डने स्वतःच्या बंदुकीतून स्वतःच्या पोटात सहा गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर न्यायालय परिसरात मोठा गोंधळ उडाला.

सुरुवातीला या पोलीस गार्डचे नाव स्पष्ट झालेले नाही. घटना घडताच तेथील नागरिकांनी तात्काळ त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. प्राथमिक माहितीनुसार, वैयक्तिक किंवा मानसिक तणावामुळे ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पोलीस विभाग आणि न्यायालय प्रशासनाने घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान, न्यायालय परिसरातील नागरिक आणि कर्मचारी या घटनेने घाबरून गेले आहेत.

———————————