ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १३ : दी गडचिरोली डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-आॅपरेटिव्ह बॅंकेत दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंतीचा कार्यक्रम शनिवार (ता. १४) आयोजित करण्यात आला आहे. गडचिरोली येथील बॅंकेच्या मुख्या कार्यालयातील श्री दत्त मंदिरात आयोजित या सोहळ्यादरम्यान दुपारी १२ ते १ वाजता श्री दत्तात्रेयाची पूजा व आरती होईल. दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत भजन व गोपालकाला आहे. सायंकाळी ५.३० ते रात्री ८.३० वाजतापर्यंत भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजतानंतर रात्री ९ वाजेपर्यंत महाप्रसाद वितरण करण्यात येईल. या श्री दत्त जयंती सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, बॅंकेचे अध्यक्ष प्रंचित सावकार पोरेड्डीवार, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. पी. आयलवार यांनी केले आहे.
—————————-