माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते गडचिरोलीत ज्योती कलश यात्रेचे स्वागत

18

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ५ : शांतीकुंज हरिद्वार येथील परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी १८ जानेवारी १९२६ रोजी हिमालयवासी ऋषी दादा गुरुदेवांच्या निर्देशानुसार शांतीकुंज येथे अखंड दीपक प्रज्वलित केले. याला १०० वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने गायत्री परिवार, गडचिरोलीच्या वतीने शांतीकुंज हरिद्वार, उत्तराखंड राज्यांमधून ज्योती कलश यात्रेचे आगमन नुकतेच इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे झाले असता या ज्योती कलश यात्रेचे स्वागत माजी नगराध्यक्ष तथा भाजपच्या जिल्हा महामंत्री योगीता पिपरे व भाजपचे लोकसभा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांनी केले. यावेळी गायत्री परिवारातील सदस्य सत्यनारायण गंधेवार, रंजनाताई कोठारे, पुष्पलता सातपुते, पात्रिकार व बोईंगवार कुटुंब तसेच गायत्री परिवारातील इतर सदस्य उपस्थित होते. या ज्योती कलश यात्रेच्या आगमनानंतर सायंकाळी ७ वाजता गायत्री यज्ञाचा कार्यक्रम सत्यनारायण गंधेवार यांच्या निवासस्थानी पार पडला. या कार्यक्रमाला गडचिरोली शहरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

——-