ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २८ : नगर परीषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचा त्याग केलेल्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील धडाडीच्या महिला नेत्या गीता हिंगे यांचा योग्य सन्मान करत राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाने त्यांना थेट महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आज महत्त्वाचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष माजी खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष माजी खासदार प्रफुल्ल पटेल व महिला प्रदेश अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गीता सुशील हिंगे यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष या पदासाठी निवड केली. या नियुक्तीमुळे पक्षाच्या महिला संघटनेच्या बळकटीकरणाला आणि राज्यातील संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळणार असल्याचे पक्षाच्या वरीष्ठ नेतृत्वाने सांगितले. पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गीता हिंगे यांनी पक्षाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि महिला सक्षमीकरण, संघटनवाढ आणि जनसंपर्क वाढविण्यासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष माजी खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष माजी खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री तथा आमदार डाॅ. धर्मराव बाबा आत्राम तसेच महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांचे त्यांनी हृदयपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
————————————











