Home Gadchiroli मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २९ नोव्हेंबर रोजी गडचिरोलीत सभा भाजपा कार्यकर्ते...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २९ नोव्हेंबर रोजी गडचिरोलीत सभा भाजपा कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने राहण्याचे आवाहन प्रणोती सागर निंबोरकर यांनी केला आहे

146

भाजपा कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने राहण्याचे आवाहन प्रणोती सागर निंबोरकर यांनी केला आहे

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, २८ नोव्हेंबर – नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा प्रचार वेग घेत असून, त्यानुसार मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची सभा २९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.सभेचे ठिकाण धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाशेजारील पटांगण, वेळ दुपारी १२ वाजता.भाजपाच्या स्थानिक उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होणार असून, आगामी निवडणुकीतील पक्षाची भूमिका, स्थानिक प्रश्न आणि विकासविषयक मुद्दे मांडले जाण्याची अपेक्षा आहे.सभेला भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.निंबोरकर यांनी पत्रकारांशी बोलताना असे वक्तव्य केले –“या सभेला भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील व शहरातील समस्त नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहाव्यात.”

 

सभेबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता वाढत असून, निवडणुकांच्या वातावरणात या कार्यक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे.