आ. डॉक्टर देवरावजी होळी यांचे निलंगा विधानसभा क्षेत्रात प्रचार कार्य जोरात.

109
  • निलंगेकरांनी आमदार डॉ.देवराव होळी यांचा शाल श्रीफळ देऊन केला सत्कार.
  •  गडचिरोली, ता.१:  
  • लातूर लोकसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचाराकरिता प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार आमदार डॉ. देवराव होळी निलंगा विधानसभा क्षेत्रात निरीक्षक म्हणून पूर्णवेळ उपस्थित आहेत. या प्रचारादरम्यान आज सकाळी त्यांनी निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी निवडणुक विषयावर त्यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी संभाजी पाटील निलंगेकर यांनी सहपरीवार आमदार डॉ. देवराव होळी यांचा विठ्ठलाची मूर्ती, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी प्रामुख्याने रूपाताई (अक्का) पाटील निलंगेकर माजी खासदार , आमदार संभाजी पाटील निलंगेकर ,अरविंद पाटील निलंगेकर उपस्थित होते.