ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २३ : गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी नागपूर येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीप्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात झालेल्या मतदानासंदर्भात विस्तृत चर्चा केली. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे भाजपचे अधिकृत उमेदावार खासदार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी केलेले कार्य, आखलेली रणनीती, अपेक्षित घवघवीत यश, पक्ष संघटनची सशक्तता तसेच आगामी निवडणुका, अशा अनेक विषयांवर त्यांनी चर्चा केली. यावेळी भाजप जिल्हा सचिव दिलीप चलाख प्रामुख्याने उपस्थित होते.