ग्लोबल गडचिरोली न्यूज, दि ,२२
आरमोरी : वैरागड येथील संजय हकीमचंद्र दोशी (वय ५०) यांचा मंगळवार (ता. २१) उष्माघाताने मृत्यू झाला.संजय दोशी यांची विहीरगावात शेती आहे. मंगळवारी सकाळी ते शेतात कामासाठी गेले होते. दरम्यान, दुपारी त्यांचा मुलगा शेतात गेला असता वडील झाडाखाली अत्यवस्थ स्थितीत आढळले. त्याने त्यांना दुचाकीवर बसवून दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाटेतच त्यांनी प्राण सोडले. वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व एक भाऊ असा परिवार आहे.
———————————









