जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर राहणार – खा.अशोक नेते, विजय आपलाच असल्याचा व्यक्त केला विश्वास..

46

ग्लोबल गडचिरोली न्यूज…

दि.०३ जून २०२४

 

गडचिरोली : आपल्या राजकीय जीवनाचा उपयोग मी आतापर्यंत समाजाच्या सेवेसाठीच केला, पुढेही करत राहणार, असे सांगत महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार अशोक नेते यांनी उद्याच्या निकालात विजय आपलाच होईल, असा विश्वास व्यक्त केला. गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील मतमोजणी प्रतिनिधींच्या बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते.

 

येथील सुमानंद सभागृहात झालेल्या या बैठकीत खा.नेते यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मेहनत घेणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रातील अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न मोदी सरकारच्या कार्यकाळात मार्गी लावण्यात मला यश आले. त्यामुळे मतदार मला विजयाची हॅट्रिक करण्याची संधी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

यावेळी मंचावर प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक जी नेते,आमदार डॉ. देवराव होळी,आमदार कृष्णाजी गजबे, माजी आमदार तथा लोकसभा प्रमुख अतुलभाऊ देशकर, भाजपा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, गोंदिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष अँड. येशूलाल उपराडे,लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी, लोकसभा समन्वयक प्रमोद जी पिपरे, शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत भाऊ जंब्बेवार, किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, डॉ.मिलींद नरोटे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा महामंत्री योगिता पिपरे,जिल्हा महामंत्री सदानंद जी कुथे,किसान आघाडी जिल्हाध्यक्ष रमेश जी बारसागडे, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी,जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, माजी जि.प.सभापती संतोष भाऊ तंगडपल्लीवार,तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

—————————————-

*सेमाना देवस्थानात सकाळी पुजा*

 

मतमोजणीसाठी रवाना होण्यापूर्वी खासदार अशोक नेते सकाळी साडेसहा वाजता गडचिरोलीकरांचे आराध्य दैवत असलेल्या सेमाना देवस्थानातील हनुमान मंदिरात सहकुटुंब पूजा करतील. त्यानंतर ते मतमोजणी केंद्रावर पोहोचतील, अशी माहिती खा.नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली.