भारतीय जनता पार्टीच्या बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश जी साहा यांचा वाढदिवस आमदार डॉ. देवरावजी होळी व सर्व पदाधिकारी ,कार्यकर्त्यांचा उपस्थितीत उत्साहात साजरा .

44

आमदार डॉ. देवराव होळी यांनी सुरेश जी साहा यांच्या वाढदिवसाचा आनंद केला द्विगुणित

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १८ : भारतीय जनता पार्टीच्या बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश साहा यांच्या वाढदिवसाला विशेष उपस्थित दर्शवत आमदार डॉ. देवराव होळी यांनी यांना केक भरवून त्यांचा वाढदिवासाचा आनंद द्विगुणित केला.

भारतीय जनता पार्टीच्या बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश साहा हे पक्षाचे निष्ठावंत व धडाडीचे पदाधिकारी असून त्यांच्या वाढदिवासानिमित्त भाजपचे पक्षश्रेष्ठी, ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. आमदार डाॅ. देवराव होळी यांच्याशीही त्यांचे ऋणानुबंध असून त्यांच्या वाढदिवसाला आमदार डाॅ. देवराव होळी यांनी विशेष उपस्थित दर्शवली. आमदार डाॅ. देवराव होळी यांनी सुरेश साहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना केक भरवला. यावेळी भाजपचे जिल्हा सचिव दिलीप चलाख, जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निखिल धोडरे, जिल्हा महामंत्री यश गण्यारपवार, युवा नेता उमेश कुकडे, उपाध्यक्ष प्रतीक राठी, शंकर दास, विलास चरडुके तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

————————————