21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम विद्यापीठाच्या प्रांगणात

55

नागरिकांनी उपस्थित राहण्याचे क्रीडा विभागाचे आवाहन

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली,दि.18(जिमाका): संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतररार्ष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानुसार दरवर्षी 21 जून हा दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन जिल्हा प्रशासन, गोंडवाना विद्यापीठ, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विविध योग संघटना, योगाशी निगडित विविध मंडळे, यांच्या सयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्याठाच्या प्रांगणात योग प्रात्यक्षीक व योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जून 2024 रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेत आयोजीत करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील महिला, युवक-युवती, क्रीडाप्रेमी, योगपटु, महाविद्यालयीन युवक-युवती, शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी, शासनाच्या विविध विभागातील सर्व अधिकारी – कर्मचारी यांनी जास्तीत संख्येने मुख्य कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे व तसेच गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, एन.सी.सी., नेहरु युवा केंद्र, विविध सामाजिक संस्था, औद्यागिक प्रतिष्ठाने इत्यादी स्थळी जागतीक योग दिन साजरा करण्याच्या दृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन करावे व आयोजनाबाबतचा अहवाल dsogad2@gmail.com या ई-मेलवर सादर करावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी कळविले आहे.