विधान परिषदेची १ सीट जिल्ह्यातील ओबीसी किंवा इतर समाजाला देण्याची आमदार डाॅ. होळी यांची मागणी

106
  • ग्लोबल गडचिरोली न्यूज,
  • गडचिरोली, ता. २१ : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या ११ जागांची निवड होणार असून त्यामध्ये १ जागा गडचिरोली जिल्ह्याला देऊन मागील ३०-४० वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्या ओबीसी व इतर समाजातील नेत्यांना संधी द्यावी, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी वैयक्तिकरित्या पक्षाकडे केली आहे.
  • गडचिरोली जिल्हा हा लोकसभा व विधानसभेसाठी आदिवासी समाजासाठी आरक्षित असल्याने इतर समाजाच्या नेत्यांना आमदार, खासदार होण्याची संधी नाही. तरीही मागील अनेक वर्षांपासून पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. आमदार, खासदार होता आले नाही तरीही ते अत्यंत निष्ठेने पक्षाचे काम करत आहेत. म्हणून या विधान परिषदेच्यानिमित्ताने १ सीट ओबीसी व इतर समाजातील निष्ठावान कार्यकर्त्यांना द्यावी, अशी वैयक्तिकरित्या मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी पक्षाच्या नेतृत्वाकडे केली आहे.