मातृशक्तीने आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे सौ बिणाराणी होळी

93

हॉटेल लॉंडमार्क गडचिरोली येथे महिलांच्या स्नेह मिलन व सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

 

दिनांक २६ जून गडचिरोली

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास निधी आणला असून त्यांच्या नेतृत्वात विधानसभा क्षेत्रात कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. जिल्ह्यातील माता भगिनींसाठी त्यांनी अनेक रोजगार विषयक उपक्रम राबविले असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे .त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मातृ शक्तीने आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या सौभाग्यवती सौ बिनाराणी देवराव होळी यांनी गडचिरोली लँडमार्क येथे आयोजित महिला स्नेहमिलन व सुसंवाद कार्यक्रमाच्या प्रसंगी केली.*

*यावेळी जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, माजी जि. प. अध्यक्षा योगिताताई भांडेकर, शहर अध्यक्षा कविताताई उरकुडे, माजी जि. प. सदस्या रंजिताताई कोडापे, धानोरा तालुका अध्यक्षा लताताई पुंघाटे, भाजपा जेष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, माजी नगरसेविका निताताई उंदीरवाडे, बेबीताई चिचघरे, वर्षाताई शेडमाके, शहर महामंत्री पल्लवीताई बारापात्रे, शहर महामंत्री रश्मी बागमारे, यांच्या सह महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या