आदिवासी आमदारांच्या शिष्टमंडळाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात आदिवासी आमदारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दिनांक २७ जून मुंबई
राज्यातील अनुसूचित जमातीच्या बजेट मध्ये कपात करून त्यातून आदिवासी विभागाच्या व आदिवासी उपाय योजना क्षेत्रातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना वेतन देणे सुरू केल्याने समाजाच्या विकासासाठी निधी कमी झाला ,आदिवासी कर्मचाऱ्यांचे प्रमोशनचे प्रमाण कमी झाले , राज्यात १२५०० बोगस आदिवासीं कर्मचारी आढळले असताना व सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला असतानाही त्यांना कमी करून जागा भरलेल्या नाहीत अशा विविध कारणामुळे आदिवासी समाजावर अन्याय होत आहे आणि तो दूर करून समाजाला न्याय द्यावा अशी मागणी आमदार डॉ देवरावजी होळी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनात आदिवासी आमदारांसोबत मा. मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांना निवेदन देताना केली.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनात आदिवासी समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन मुख्यमंत्र्याना देण्यात आले व त्यातील मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत विस्तृत चर्चाही करण्यात आली.









