अधिवेशनादरम्यान आमदार डाॅ. देवराव होळी यांनी पाहिली मन की बात

91
  • ग्लोबल गडचिरोली न्यूज,
  • गडचिरोली, ता. ३० : देशाचे लोकप्रिय यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ३० जून २०२४ “मन की बात ” च्या १११ व्या भागाचे प्रक्षेपण आमदार डॉ. देवराव होळी यांनी विधिमंडळ पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबई येथे पूर्ण वेळ पाहिला.
  • ३० जूनरोजी आकाशवाणी आमदार निवास मुंबई येथे आमदार डाॅ. होळी यांनी  “मन की बात ” कार्यक्रम पूर्णवेळ पाहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिनदा भारताचा पंतप्रधान होण्याचा विक्रम केला आहे.मागील दहा वर्षांत त्यांचे कार्यकाळात देशाची चौफेर प्रगती झाली. त्यांच्या कार्यापासून आपण प्रेरणा घेत असतो. त्यांनी मेक इन इंडियाचा नारा दिल्यावर आपण मेक इन गडचिरोली सुरू केले. त्यांचे देशाला उद्योगात अग्रेसर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात अभिनव अशी उद्योग क्रांती यात्रा काढली. त्यांच्यापासून देशसेवा, समाजसेवेची प्रेरणा मिळते व अनेक विकासकामे सहज करता येतात. त्यासाठी मन की बात या कार्यक्रमातून मिळणारी प्रेरणाही महत्त्वाची आहे, असे आमदार डाॅ. देवराव होळी म्हणाले.
  • —————————–