प्रदेश कार्यालयातील आदिवासी आघाडीच्या बैठकीला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची उपस्थिती.

102

आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात बैठकीचे आयोजन

 

मा.उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तर राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी यांच्या उपस्थितीत आदिवासी आमदार खासदार व पदाधिकाऱ्यांची बैठक

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक 3 जून मुंबई

 

आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासंदर्भांत भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आदिवासी आमदार खासदार व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजीत करण्यात आली. या बैठकीला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

या बैठकीला मा.उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी यांनी मार्गदर्शन केले.

 

बैठकीला आदिवासी विकास मंत्री मा.ना.डॉ.विजयकुमार गावीत, माजी खा.अशोकजी नेते राष्ट्रीय महामंत्री भाजपा आदिवासी आघाडी, मा.आ उत्तमजी इंगळे प्रदेश अध्यक्ष भाजपा आदिवासी आघाडी, माजी केंद्रीय मंत्री डॉ.भारतीताई पवार, मा.माधवीताई नाईक भाजपा प्रदेश महामंत्री , माजी.खा.डॉ.हिनाताई गावीत, आमदार डॉ.अशोकजी ऊईके, मोर्चा. माजी आमदार संजयजी पुराम, आमदार .डॉ.संदीप जी धुर्वे, भाजपा गडचिरोली जिल्हा महामंत्री श्री प्रकाशजी गेडाम, यांचे सह भाजपा आदिवासी आघाडीचे प्रदेश पदाधिकारी,विधानसभा प्रमुख,उपस्थित होते.