ग्लोबल गडचिरोली न्यूज,
अहेरी… जिल्ह्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या तालुक्यांपैकी अहेरी तालुका मुख्यालय महत्वाचे ठिकाण आहे. या तालुक्याच्या ठिकाणी (आलापल्ली) येथे आल्याशिवाय जिल्हा मुख्यालय अथवा राज्यातील अन्य जिल्ह्यांकडे जात येत नाही. मात्र, अहेरी तालुका मुख्यालयात येण्यासाठी असलेल्या मुख्य मार्गाची दुरवस्था झाली असल्याने अहेरी तालुक्यासह सिरोंचा, भामरागड तालुक्यातील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या परिसरात सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्याची देण्यात यावी , अशी मागणी अहेरी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तालुकाध्यक्ष डॉ.अ.निसार शेख (हकीम) यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने तहसीलदार यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे अहेरी तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून विविध समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी फारसे प्रयत्न होतांना दिसून येत नाही. आलापल्ली- सिरोंचा या रस्त्यावर बांधकाम अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात भामरागड आणि सिरोचा मार्गावरील नागरिकांना दळणवळणाच्या समस्येचे कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.आलापल्ली – लगाम 20 किलोमीटर मार्ग वर्क ऑर्डर मंजूर होऊनही कामाला सुरवात झाली नाही
दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी पावसाळ्यात हा मार्ग बंद राहण्याची शक्यता आहे .या तीनही महामार्गावरील चालू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या पुलांचा दर्जा निकृष्ट दर्जाचा आहे. त्यामुडे भविष्यात मोठी जीवित हानीची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत प्राणहिता – अहेरी या मार्गाचे काम पावसाळ्या अगोदर पूर्ण करण्याची तरतूद असतांनाही कंत्राटदाराच्या मुजोर कार्यशैलीमुळे या मार्गाचे काम थांबलेले आहे. यांची आर्थिक तरतुद थांबविण्यात यावी यांची. अहेरी विधानक्षेत्रतील हा एक प्रमुख मार्ग आहे मागील कित्येक वर्षापासून हे काम का रखडले आहे याची गंभीरता लक्षात घ्यावी.अहेरी – महागाव रस्त्याचे एका महिन्याअगोदर पूर्ण झाले पण आताच यावर मोठमोठे खड्डे भेगा पडलेल्या आहेत.
आलापल्ली-मुलचेरा-घोट आणि आष्टी या आपत्कालीन मार्गची अवस्था अत्यंत बिकट आहे मोठमोठे खड्डे तसेच साईड बंप साठी वापरण्यात आलेला मातीयुक्त निकृष्ट दर्जाच्या मुरुमांमुळे पावसाळ्यात या मार्गाने प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे आहे.
PMGSY / CMGSY योजनेअंतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेची कनेक्टिव्हिटी
मुख्यमार्गाशी जोडणे हा मुख्य उद्देश असतांनाही. या योजनेअंतर्गत झालेली कामे हि निकृष्ठ दर्जाची आहे. वर्क ऑर्डर मिळाल्या नंतरही कामे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने गतीने चालू आहे.उदा – अहेरी – खमनचेरु हा अहेरी मुख्यालयाचा आपत्कालीन मार्ग आहे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे असतांनाही हे रखडलेले आहे.
MSEB महावितरण कंपनीच्या बिल वितरण विभागाच्या अनागोंदीला कारभारामुळे तालुक्यातील जनता वैतागली आहे. दोन दोन आठवडे विदुत पुरवठा नसलेल्या गावांना सरासरी बिलच्या नावाने गरीब जनतेचे आर्थिक शोषण केले जात आहे चुकीची बिले ग्राहकांच्या माथी मारली जात आहेत. वीज भरण्यात थोडाही विलंब कनेक्शन तोडण्याचा दम कर्मचारी देत आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागातील बऱ्याच ठिकाणचे कलंडलेले, तिरपे झालेले वीज वाहिन्यांचे खांब, तारांना पडलेल्या झोळमुळे तारा एकमेकांत गुंतण्याचे वाढलेले प्रमाण, कलंडलेले व तिरपे झालेले पोल बघता भविष्यात वारा आणि पावसामुळे हे पोल जमीनदोस्त होऊन दुर्घटना होण्याच्या शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी उपलब्ध Tree Cutting तसचे अन्य निधी मंजूर असतांनाही पावसाळ्या पूर्वीची अतिमहत्वाच्या कामे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे क्षणाचा वाराधून आलाकी विजेचा लपंडाव चालू.अहेरी येथील 33 kv प्रकल्पाची अंतिम मुद्दत
ठरवण्यात यावी अहेरी बस महामंडळ अहेरी विधासभा क्षेत्राचे अत्यंत महत्वाचे आगार आहे या भागाला मुख्य प्रवाहाशी जोडणारा मुख्य दुआ आहे मात्र मागील 7 वर्षांपासून या आगाराला शासनाने एकही नवीन बस उपलब्ध केली नाही. जुन्याच भंगार बसेसना मलमपट्टी करायची आणि ती चालवायची या आगारामध्ये 70 टक्के मनुष्यबळ संख्या कमी. यामुळे बसेस नियोजित वेळेनुसार 2 ते 3 तास विलंबाने चालतात. आपत्कालीन रुग्णांचा प्रवास ? शैक्षणिक विज्ञार्थी याचे भविष्य ? यांची जवाबदार कोण घेणार ?
24 जून रोजी एका निष्पाप बालक आर्यन अंकित तलांडी वय 4 वर्ष रहा कोरली याचा मृत्यू झाल्याची घटना निदर्शनास आली आहे. कुटुंबाने दोषीं आरोग्य अधिकारी आणि रुग्णवाहिका चालक यांच्यावर कार्यवाही करून सदोष मनुष्य वधाचा गुन्हा अंतर्गत कार्यवाही करण्याची करण्यात यावी. अहेरी येथील महिला व बाल कल्याण रुग्णालय काम कधी पूर्ण होणार ? अहेरी तालुक्या मधील सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत झालेल्या विकासकामंमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. चौकशीचे आदेश देण्यात यावे.
अहेरी तालुक्यातील मार्गांची गंभीर अवस्था असतांना संवेदनशील कमकुवत लहान मार्गावरून उदा सन्द्रा – वेंकटरावपेठ 2) आणि तेलंगणा वांगेपल्ली- अहेरी,3) वांगेपाली – महागाव,4) अहेरी – खमंचेरू, या मार्गावरून मोठमोठ्या ट्रकच्या साहाय्याने अवैध्य रित्या रेती, गिट्टी तसेच अन्य अवैध्य मालाची तस्करी चालू. या लहान मार्गावरून जड वाहतुकीची परवानगी नसतांनाही या मार्गाने जड वाहतूक चालू आहे. तात्काळ या जळं
वाहतुकीला बंदी घालण्यात यावी
अहेरी तालुक्यात जनतेचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन शेती आहे 90 टक्के जनता शेतीवर व्यवसायावर अवलंबून आहे शासनाअंतगत मंजूर योजना तळागाळात पोहचत नाही. दुष्काळ, अल्प नफा आणि कर्जाच्या समस्यामुळे शेतकऱ्यांची कृषी विमा योजनेचे टक्केवारी वाढविण्याची गरज आहे अहेरी तालुक्यातील वावरी भागातील शेतीचे PH लेव्हल सर्वे करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी.
त्याचा प्रमाणे जलसंपदा विभाग ,जिल्हा परिषद सिंचाई विभागाची विकास कामे, वनविभाग जलसंधारण विभाग, भूमी अभिलेख विभागा अंतर्गत अहेरी शहरातील मोजणी, महसूल विभाग, नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत सुरु असलेली विकास कामे, कंत्राटदारांनी केलेल्या चुका, झालेले शेतकऱ्यांचे नुकसान तथा अन्य योजनांबद्दल विस्तृत चर्चा करण्यात आली.चालू झालेला पावसाळी हंगाम असुन यातून अहेरी तालुक्यातील शेतकरी, नागरिकांच्या समस्या प्राधान्य क्रमाने सोडविण्यात याव्या. तसेच विकास कामांचा दर्जा उत्तम ठेवून कामे तातडीने पूर्ण करावे. तसेच विकास कामांत हयगय व दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी असो अथवा कंत्राटदार यांची गय करण्यात येऊ नये
अहेरी विधानसभा क्षेत्रातील मलचेरा, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली आणि अहेरी दूरगामी भागातील जनता हि शिक्षण क्षेत्र, उपजिल्हा रुग्णालय, अपर जिल्हाधिकारी कार्यालय, प्राणहिता पोलीस अहेरी जिल्हा मुख्यालय, उपविभागीय कार्यालय अहेरी, कार्यकारी अभियंता कृषी विभाग, उच्च शिक्षण, न्यायालय या पायाभूत सुविधा करीत अहेरी केंद्र अवलंबून आहेत. वरील सर्व मुद्दे अत्यंत संवेदनशील आहेत शासनाच्या आणि अधिकाऱ्यांच्या दिरंगाई मुळे हि परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थती मुळे जीवितहानी किंवा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्राचे नुकसान झाल्यास याचे जवाबदार शासन राहणार येत्या 7 दिवसात यावर उपाय योजना न काढल्यास अहेरी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल. असे या निवेदनात
मागण्या मांडण्यात आले आहे आहे
डॉ अ. निसार हकीम अध्यक्ष अहेरी तालुका काँग्रेस कमिटी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम,रज्जाक कुरेशी, रागोबा गौरकर,अशोक आत्राम, गणेश उपलपवार, श्रीनिवास गंधमवार, नितीना पटवर्धन, संतोष रामगीरवार, सुमीत झाडे, व्यंकट डोंगरे, विशाल गणमुकुलवार, सपना नैताम, गजानन झाडे, जीवन गणमुकुलवार, राकेश तलांडे, नितीन बंडमवार, विशाल गजाडीवार, रूपेश बंदेला, सुरेश दुर्गे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.









