विषबाधा झालेल्या रुग्णांची आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतली भेट

85

धानोरा तालुक्यातील रोपिनगट्टा येथे नामकरण सोहळ्यात मांसाहारी जेवणातून दिले विष

 

जिल्हा सामान्य रुग्णालयात जावून रुग्णांची आस्थेने केली विचारपूस

 

दि. ६ जुलै २०२४ गडचिरोली

 

धानोरा तालुक्यातील झाडापापडा ग्रामपंचायत अंतर्गत रोपिनगट्टा येथे 4 जुलै रोजी नामकरण सोहळ्यात बनविलेल्या मांसाहारी जेवणातून काहींना विषबाधा झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती कऱण्यात आले. मुंबई येथे अधिवेशनात असल्याने बातमी समजताच आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी फोन वरून आरोग्य विभागाला सर्व रुग्णांवर तातडीने औषधोपचार सुरू करण्याचे निर्देश दिले होते. आज गडचिरोली येथे पोहोचताच त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांची भेट घेतली व त्यांची आस्थेने विचारपूस केली.*

 

*रुग्णांवर तातडीने औषधोपचार झाल्याने प्रकृती आता धोक्याबाहेर असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे . याप्रसंगी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना यथायोग्य सेवा देण्याची सूचना केली. यावेळी बाह्य रुग्ण अधिकारी बागराज धुर्वे, गडचिरोली शहर अध्यक्ष मुक्तेश्वर जी दुर्गापूर सरपंच परमेश्वर गावडे यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.