आदिवासी कलाकारांनी बनवलेली वैविध्यपूर्ण उत्पादने बाजारात विक्रीसाठी सर्वतोपरी मदत करणार

109

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

आमदार डॉ. देवरावजी होळी

 

आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी बाजार मार्केटिंग चमुने आमदार डॉ. देवरावजी होळी यांची घेतली भेट.

 

आदिवासी समाज बांधवानी बनविलेल्या वस्तुंना बाजारपेठ निर्मिती साठी सहकार्य करणार

 

दि. 16 जुलै 2024 गडचिरोली

 

गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधवानी बनविलेल्या वस्तुंना मोठी बाजारपेठ उपलब्ध नसून बनविलेल्या वस्तू बाजारात विक्री करणे शक्य होत नाही त्यामुळे वस्तुंना बाजारपेठ निर्मिती करून आपल्या वस्तुंना योग्य बाजार भाव मिळेल व कुटुंबाचा उदर निर्वाह करण्यास मदत होईल. याप्रसंगी आमदार महोदयांनी आदिवासी कलाकारांनी बनवलेली वैविध्यपूर्ण उत्पादने जगभरातील ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येईल असे मत व्यक्त केले

 

*याप्रसंगी अप्पर आयुक्त रवींद्रजी ठाकरे, जिल्हा नियोजन अधिकारी खडतकर साहेब ,धनराज जी डबले, लोकमत जिल्हा प्रतिनिधी संजय जी तीपाले, स्वप्नील मसराम, वैभव मडावी, अध्वीतिय उईके, निनाद कुमरे, प्रफुल मडावी सुकेश मडावी