पूर परिस्थिती संदर्भातील अहवाल.

132
  • जिल्हा- गडचिरोली
  • ग्लोबल गडचिरोली न्यूज,
  • दि. 18.07.2024, वेळ सकाळी 10.30 वाजता
  • —–
  • अ) पर्जन्यमान (मि.मी.) मध्ये:
  • आज दि. 18 जुलै, 2024 चे सकाळी 8.30 वाजता चे नोंदीनुसार (Manual Rain Gauge) जिल्ह्यात एकूण सरासरी 55.1 मि.मी. पाऊस झालेला आहे, 40 पैकी 14 मंडळामध्ये अतिवृष्टी ची नोंद झालेली आहे.
  • ब) धरण पाणी साठा व विसर्ग :
  • 1. वैनगंगा नदी :
  • • गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 19 गेट उघडलेले असुन 2,214 क्युमेक्स (78,187 क्युसेक्स) विसर्ग आहे.
  • • चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 4,323 क्युमेक्स (1,52,667 क्युसेक्स) आहे.
  • • वडसा, वाघोली व आष्टी या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे.
  • 2. वर्धा नदी :
  • • निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी सर्व 31 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.
  • • बामणी (बल्हारशा) व सिरपूर टाऊन या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वर्धा नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे.
  • 3. प्राणहिता नदी :
  • • दिना प्रकल्प 63 टक्के भरलेला असून सांडव्यावरुन विसर्ग निरंक आहे.
  • • महागांव सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार प्राणहिता नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे.
  • 4. गोदावरी नदी :
  • • श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पाचे 62 पैकी 62 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.
  • • लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 85 गेट उघडलेले असुन विसर्ग 1,512 क्युमेक्स (53,400 क्युसेक्स) आहे. बॅरेज ची पाणी पातळी 89.90 मी. असुन पूर्ण संचय पातळीच्या 10.10 मी. ने खाली आहे.
  • • कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार गोदावरी नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे.
  • *5. इंद्रावती नदी :*
  • • जगदलपूर, चिंदनार, तुमनार व पाथागुडम या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इंद्रावती नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे.
  •      —
  • *🟠इशारा :*
  •          नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक तसेच वैनगंगा, प्राणहिता, वर्धा, गोदावरी व इंद्रावती या मुख्य नद्यांची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. तसेच *गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणातून 5,000 क्युमेक्स* पर्यंत विसर्ग टप्याटप्याने प्रवाहीत करण्यात येणार असल्याने वैनगंगा नदी काठावरील गावातील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी, तसेच नदी पात्रात आवागमन करु नये.
  • *🟡हवामान संदेश :*
  •          भारतीय हवामान विभागाचे नागपूर, भोपाल, रायपूर व हैद्राबाद केंद्र यांचे दिनांक 17.07.2024 रोजीच्या पर्जन्यमान इशारा संदेशानुसार वैनगंगा-प्राणहिता, वर्धा, इंद्रावती व मध्य गोदावरी या उपखोऱ्यातील काही भागात पुढील 48 तासाकरीता *मुसळधार* स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता असल्याचे संकेत दिलेले आहे. तसेच गडचिरोली जिल्हयात 24 तासाकरीता पर्जन्यमानाचा *येलो अलर्ट* दिलेला असून काही ठिकाणी *फ्लॅश फ्लड रिस्क* चे संकेत दिलेले असल्याने कृपया उचित दक्षता घ्यावी.