उपमुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आ डॉ. देवरावजी होळी यांच्या पुढाकारातून विविध कार्यक्रमांचे आयोजन

96

रुग्णालयात फळ वाटप तर विठ्ठल नगरी मुल रोड चामोर्शी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक 22 जुलै 2024 चामोर्शी

 

राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व लोकप्रिय जनसेवक ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या पुढाकारातून चामोर्शी येथे फळ वाटप व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप तर विठ्ठल नगरी मुल रोड चामोर्शी येथे वृक्षारोपण करून नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरा केला. याप्रसंगी डॉ. वाघमारे. भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख. जयराम चलाख. भाजपा जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे. प्रतीक राठी. लोमेश सातपुते. विलास चरडूके सुनील सोरते. दिलीप नैताम. दीपक नैताम. संजय चलाख. अनिल नंदगीरिवार. पुरुषोत्तम घ्यार यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.