मा.खा.श्री.अशोकजी नेते यांची चामोर्शी येथील माजी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वरजी सेलुकर यांच्या निवासस्थानी भेट घेतली…

113

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

(चामोर्शी)

दिं. ०३ सप्टेंबर २०२४

 

चामोर्शी शहरातील हनुमान नगर वार्ड क्र.१६ येथील जुने जानते भाजपा संघटनेच्या वाढीमध्ये अतिशय महत्वाची भुमिका निभवणारे माजी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मान.श्री.रामेश्वरजी सेलुकर यांना अनेक दिवसा पासून लकवा असून अधेमध्ये तब्बेत बरी नसते.असे माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांना कळल्याने आज तान्हा पोळा च्या निमित्ताने चामोर्शी येथे आले असता त्यांच्या निवासस्थानी या प्रसंगी भेट घेऊन आपल्या आरोग्याची व तब्यतीची काळजी घ्यावी. असे भेटीदरम्यान व जुन्या जाणत्या गप्पागोष्टी झाल्या. यावेळी तान्हा पोळा च्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी कामगार आघाडी चे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, गणेश नेते, व कार्यकर्ते उपस्थित होते.