_चामोर्शी येथे हिंदु संस्कृती जपत तान्हा पोळा उत्सव साजरा…मा.खा.अशोकजी नेते यांचे तान्हा पोळा उत्सवात उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन..

74
  • ग्लोबल गडचिरोली न्यूज,
  •  नंदीबैल पोळा बालगोपालांसह विविध वेशभूषेत साजरा….
  • मा.खा.अशोकजी नेते यांच्या कडून तान्हा पोळा उत्सवात सहभागी झालेल्या प्रत्येक नंदीबैलपोळाला बाँक़्सचे बक्षीस वितरण…
  • भव्य तान्हा पोळा महोत्सव बाजार चौक नगरपंचायत समोर चामोर्शी येथे मोठया थाटामाटात संपन्न….*
  • दिं.०३ सप्टेंबर २०२४
  • चामोर्शी:-चामोर्शी शहरात तान्हा पोळा हा सण लहान बालगोपालांसह मुले आप आपल्या लाकडी नंदीबैलाला सजवित बालगोपाल विविध वेशभूषेत नटवीत सामाजिक प्रतिमा साकारत भव्य तान्हा पोळा महोत्सव बाजार चौक नगरपंचायत समोर चामोर्शी येथे मोठया थाटामाटात साजरा करण्यात आला.
  • या तान्हा पोळा उत्सवाचे उद्घाटन समारंभ माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून फित कापून करण्यात आले.
  • महाराष्ट्र गीत हा अतिशय सुरेखपनाने गात तान्हा पोळा उत्सवाला सुरुवात केली.
  • या तान्हा पोळा उत्सवाला माजी खासदार अशोकजी नेते यांनी उद्घाटनप्रसंगी बोलतांना म्हणाले चामोर्शी शहरात तान्हा पोळा हा उत्सव हिंदू संस्कृतीला जपत विविध पद्धतीने नंदीबैलपोळाला फुगे, तोरण, पताका लावुन सजवित बालगोपालांनी आपली प्रतिमा विविध वेशभूषेत साकारून जसे बटी बचाव,बेटी पढाओ, मुख्यमंत्री लाडकी बहीण, जय येळकोट मल्हार, शेतकरी असे अनेक वेशभूषीत साकारली त्यांचे कौतुक करतो व तान्हा पोळा हा सण अतिशय चांगल्या तऱ्हेने आशिष पिपरे व त्यांचे सहकाऱ्यांनी आयोजन केले त्यांचे अभिनंदन करत या उत्सवाला शुभेच्छा देतोय व माझ्या कडून एक छोटीशी बालगोपालांना भेट देतोय !असे प्रतिपादन मा.खा.अशोकजी नेते यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
  •  या प्रसंगी मंचावर तालुका संघचालक किशोर ओल्लालवार, प्राचार्य हिराजी बनपुरकर, सामाजिक नेते माणिकजी तुरे, कार्यक्रमाचे आयोजक भाजपाचे युवा नेते तथा नगरसेवक आशिषभाऊ पिपरे,आयोजक सामाजिक नेते अमोलजी आईचवार,सामाजिक नेत्या बिनाराणी होळी,माजी न्यायाधीश दिक्षीत साहेब, नगरसेविका रोशनी वरघंटे, नगरसेविका सोनालीताई पिपरे, प्रेमाताई आईचवार,पोलीस निरिक्षक कातबाने, कामगार आघाडी चे जिल्हाध्यक्ष सुधाकर जी पेटकर, महिला मोर्चा च्या तालुकाध्यक्षा अनिता राँय,जिल्हा सचिव माधवी पेशट्टिवार, कार्यक्रमाचे संचालन तथा मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेशजी अधिकारी जिल्हा सचिव दिलिप चलाख, प्रतिक राठी,ॲड.सुरज मेकरत्तीवार,प्रफुल भांडेकर, तसेच मोठया संख्येनी शहरातील नागरिक बंधू भगिनीं व बालगोपालांसह उपस्थिती होते.