शेती विषयक प्रशिक्षण शिवार फेरीला आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दाखवली हिरवी झंडी

74

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र गडचिरोली च्या वतीने शिवार फेरी

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दि. 20 सप्टेंबर 2024 गडचिरोली

 

गडचिरोली : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र गडचिरोली च्या वतीने शिवार फेरीला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीन दिवसीय अकोला येथे शेती विषयक प्रशिक्षणासाठी 100 शेतकरी जाणाऱ्या गाडीला आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी हिरवी झंडी दाखवत शिवार फेरी साठी रवाना करण्यात आले.

 

यावेळी प्रामुख्याने वरिष्ठ शास्त्रज्ञ संदीप कऱ्हाळे, भाजपा जेष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, डॉ. प्रीतम चिरडे, नरेश बुध्येवार, एस. पी. सलामे, ए. डी. ठाकरे तथा शेतकरी उपस्थित होते.