सर्वांनी एकजुटीने काम करून गडचिरोली विधानसभेचा कमळ फुलवूया

113

मा.खा.अशोकजी नेते यांचे ग्रामिण व शहर चामोर्शी येथील मंडलाच्या बैठकीत प्रतिपादन..

ग्लोबल गडचिरोली न्यूज

दिं. ३० आक्टोंबर २०२४

 

चामोर्शी:-भाजपा तालुका चामोर्शी ग्रामिण व शहर जि.प.सर्कल,पं.समिती सर्कलची बैठक भाजपा कार्यालय तालुका चामोर्शी येथे आयोजित करण्यात आली होती.

 

या बैठकीला माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तसेच निवडणूक विधानसभा संचालन समितीचे सहसंयोजक श्री.अशोकजी नेते यांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली बैठकीचा समारोप करतांना म्हणाले

भारतीय जनता पार्टी – मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांना उमेदवारी जाहीर करून सर्वांच्या समकक्ष उमेदवारी नामांकन दाखल केला यासाठी गडचिरोली विधानसभेत आता कमळ फुलवूनच विजय करून थांबूया असे आवाहन व निश्चय बैठकीच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांना मा.खा.नेते यांनी केले.

 

पुढे बोलतांना देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांनी या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये पंतप्रधान असतांना अनेक विकासाभिमुख कामे करत नागरिक जनतेपर्यंत अनेक योजना आमलात आणुन विकासात्मक दुष्टीकोन ठेऊन काम केले.याबरोबरच महिला भगिनींच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्वाकांक्षी योजना महिलांसाठी आणली.असे अनेक योजना लोकोपयोगी सरकार राबवित आहे.लोकसभेत विरोधकांनी संविधान, तसेच महिलांच्या खात्यात महिन्याला खटाखट साडेआठ हजार असा खोटानाटा अपप्रचार करत मतदारांची दिशाभुल केले. पण आता आगामी येणाऱ्या विधानसभेत विजय आपलाच होईल.

 

येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विकास कामावर महायुतीचेच सरकार येईल.असा विश्वास व्यक्त करतोय.गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे यांना निवडून आणण्यात विजयाचा संकल्प करावे.असे प्रतिपादन या समारोप बैठकीत मा.खा.अशोकजी नेते यांनी प्रतिपादन केले.

 

जनसेवेचे व्रत हाती घेऊन सामान्य जनतेचे प्रश्न व विधानसभा क्षेत्रातील विकासाच्या कामाला मी गती देईन असा विश्वास व्यक्त करतोय. यासाठी आपण मला आशीर्वाद द्यावे. असे महायुतीचे उमेदवार डाँ.मिलिंदजी नरोटे यांनी बैठकीत व्यक्त केले.

 

या बैठकीत प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्र, पंचायत समिती क्षेत्राचे प्रभारी नेमण्यात आले.एका जि.प.क्षेत्रात अकरा पदाधिकाऱ्यांची नेमणुक करून प्रभावीपणे काम करावे असे नियोजन करण्यात आले.

 

यावेळी मंचावर प्रामुख्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे, तालुकाध्यक्ष आनंदजी भांडेकर,किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, जेष्ठ नेते रामेश्वर जी सेलुकर, माजी.जि.प.सदस्य नामदेवराव सोनटक्के, माजी.जि.प.सदस्य प्रकाशजी कुकुडकर,जेष्ठ नेते मनमोहन बंडावार,जेष्ठ नेते माणिकचंद कोहळे, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकरराव भांडेकर,ता.महामंत्री विनोद गौरकर,जेष्ठ नेत्या आकोली बिश्वास, नगरसेविका तथा भाजपा नेत्या रोशनी वरघंटे, माजी जि.प.सदस्या शिल्पा राँय,प्रतिमा सरकार,युवा नेते नरेश अल्सावार,ओबीसी नेते भाष्कर बुरे,आदिवासी नेते रेवनाथ कुसराम, तसेच मोठया संख्येने भाजपा पदाधिकारी,बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व जि.प.,पं.स.क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.