Home Gadchiroli 10 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा

10 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा

125

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, दि. 8 : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत 10 नोव्हेंबर 2024 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार असून गडचिरोली जिल्ह्यात ही परीक्षा दोन सत्रामध्ये होणार आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर -1 करीता 2343 उमेदवार 10 केंद्रावर आणि पेपर-2 करीता 3271 उमेदवार 15 केंद्रावर परीक्षा देणार आहेत. परीक्षेची वेळ सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व दुपारी 2.30 ते सांय.5 वाजेपर्यंत आहे. परीक्षार्थींनी पेपरला दीड तासापुर्वी उपस्थित रहावे. सकाळच्या पेपरला 10.10 वाजतानंतर आणि दुपारच्या पेपरला 2.10 वाजेनंतर प्रवेश दिला जाणार नाही. सदर परीक्षेदरम्यान सी.सी.टी.व्ही. कॅमेरे राहणार आहे. कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार झाल्यास संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल. तसेच परीक्षेकरीता मुळ ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्यामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, ड्राव्हींग लायसन्स, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, शाळा-महाविद्यालयाचे अद्यावत ओळखपत्र कोणतेही एक ओळखपत्र अनिवार्य राहील. काळा किंवा निळा शाईचा बॉलपेन व्यतिरिक्त इतर इलेक्ट्रानिक साहित्य, कॅलक्युलेटर, कागदपत्रे बाळगता येणार नाही, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी कळविले आहे.