गोंडवाना विद्यापीठाचे प्रा. डाॅ. मनिष देशपांडे यांना ‘सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ’ पुरस्कार

90

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १३ : गोंडवाना विद्यापीठाचे सहायक प्रा. डॉ. मनीष विलास देशपांडे यांना नेपाळ येथील काठमांडू येथे आयोजित दुसऱ्या भारत-नेपाळ मैत्री शिखर परिषदेत सोमवार (ता. ११) ‘सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ’ (Inspiring best scientist award) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

हा पुरस्कार नेपाळ सरकारचे संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री पृथ्वी सुबा गुरुंग यांच्या हस्ते विविध भारतीय आणि नेपाळी विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. प्रा. डॉ. देशपांडे यांना संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात शैक्षणिक विकास आणि संशोधन कार्यातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. हा सन्मान केवळ गडचिरोलीच नव्हे तर संपूर्ण देशाला गौरवान्वित करणारा आहे. नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीतून बाहेर पडून डॉ. देशपांडे यांनी केवळ उच्च शिक्षण क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल केले नाही, तर जागतिक मंचावरही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. हा पुरस्कार या गोष्टीचे प्रमाण आहे की, आव्हानात्मक वातावरणातही प्रतिभा फुलू शकते. डॉ. देशपांडे यांना मिळालेल्या या पुरस्काराने गडचिरोलीतील तरुणांमध्ये संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करीअर करण्याची नवीन आशा निर्माण झाल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.