ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली, ता. १३ : जिल्ह्याच्या माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील व अतिदुर्गम ठिकाणी असलेल्या लाहेरी येथील उप पोलिस स्टेशनच्या वतीने कबड्डी, व्हाॅलिबाॅल, रेला नृत्य स्पर्धेसह आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कबड्डी, व्हॉलीबॉल व रेला नृत्य स्पर्धा १३ व १४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजतापासून लाहेरी पोलिस स्टेशनच्या परीसरातच होतील. या स्पर्धेतील प्रथम विजेत्यांना ३ हजार रुपये बक्षिस, द्वितीय बक्षिस २ हजार रुपये, तर तृतीय बक्षिस १ हजार रुपये आहे. तसेच गडचिरोली जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने लाहेरी उप पोलिस स्टेशन येथे रविवार (ता. १५) पोलिस दादालोरा खिडकीअंतर्गत आरोग्य मेळवा आयोजित करण्यात आला आहे. यात नेत्र तपासणी, प्राथमिक आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह, कुपोषण, गरोदर माता, रक्त तपासणी करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला मार्गदर्शक व उद्घाटक म्हणून भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते राहणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ. भोकरे, डाॅ. प्रगती टाक, पोलिस उप निरीक्षक आकोश पुयड आदींची उपस्थिती राहिल. अधिक माहितीकरिता प्रभारी अधिकारी सचिन सरकटे मो. क्र. ९९२२५३७०८८, पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे मो. क्र. ७४९८७६०७९५, पोलिस हवालदार मेजर विशाल उमरे मो. क्र. ९४२३६२१२६२ यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
———————————–









