पत्रकार मुकेश चंद्रकारच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाईची मागणी.

82

 

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ९ : छत्तीसगड राज्यातील पत्रकार मुकेश चंद्राकर याची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणाची निषेध म्हणून गुरुवार ९ जानेवारी रोजी शहरात पत्रकारांनी मूकमोर्चा काढला. तसेच मुकेश चंद्रकारच्या हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना सादर केले.

 

छत्तीसगड राज्यातील बस्तर जॅक्शनचे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच गडचिरोली जिल्ह्यात वाळू, मुरूम माफीया, दारू विक्रेते यांचे अवैध धंदे बंद करावे. जिल्ह्यातील पत्रकार हे वृतांकन करण्यासाठी माओवादग्रस्त भागात जात असतात तेथे त्यांना कोणतीही सुरक्षा नसते. मुकेश चंद्राकर हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती गडचिरोली जिल्ह्यात होऊ नये, महाराष्ट्र शासन अधिनियम सन २०१९ क्र. १९ दिनांक ८ / १० / २०१९ राजपत्रानुसार जिल्ह्यातील पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे आदी मागण्यांकरिता गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून जिल्ह्याधिकारी अविश्यांत पडां व जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मागण्याचे निवेदन दिले. हे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांमार्फत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींना पाठविण्यात आले. या मोर्चा पत्रकार प्रा. मुनिश्वर बोरकर, व्येंकटेश दुडमवार, संजय टिपाले, सुरेश पद्मशाली, मुकुंद जोशी, उदय धकाते, हेमंत डोर्लीकर, प्रल्हाद म्हशाखेत्री, प्रकाश ताकसांडे, प्रकाश दुबे, जगदीश कन्नाके, मारोती भैसारे, विलास ढोरे, सूरज हजारे, राजरतन मेश्राम, प्रा. दिलीप कवरके, नाशिर जुम्मन शेख, हेमंत हुनेदार, महेश सचदेव, दिनेश बनकर, कृष्णा वाघाडे, हस्ते भगत, नाझिर शेख, भाविकदास करमनकर, मुकेश हजारे, संदीप कांबळे, विनोद कुळवे, किशोर खेवले, सोमनाथ उईके, निलेश सातपुते, श्रीमंत सुरपाम, शंकर ढोलगे, जयंत निमगडे, हर्ष साखरे, कबीर निकुरे, प्रमोद राऊत, विजय शेडमाके, टावर मडावी, उमेश गझपल्लीवार, पुंडलिक भांडेकर, अनुप मेश्राम, श्रावण वाकोडे, कालिदास बुरांडे, धनराज वासेकर, विलास वाळके. गोर्वधन गोटाफोटे, रवी मंडावार, राजेश खोब्रागडे, चोखोबा ढवळे, सतीश टेंभुर्णे, गेडाम, धम्मपाल दुधे, नाजुक भैसारे, रेखा वंजारी, विजया इंगळे, तिलोत्तमा हाजरा आदीसह जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

—————————————-