ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १५ : शहरापासून ५ किमी अंतरावरील गोगाव फाट्याच्या समोर मंगळवार (ता. १४) रात्री १० वाजताच्या सुमारास एका कारने मोटारसायकल स्वारांना जोरदार धडक दिली. यात मोटरसायकलवरील दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला आहे. मयुर विलास भुरसे (वय २५) रा. ठाणेगाव, ता. आरमोरी, विकास मधुकर धुडसे, (२५) रा. डोगरसावंगी, ता. आरमोरी अशी मृतकांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार मृतक मयुर विलास भुरसे हा त्याच्या दुचाकी क्रमांक एम.एच. ३३ वाय २५१३ ने गडचिरोलीवरून ठाणेगावकडे १० वाजता दरम्यान त्याचा मित्र विकास मधुकर धुळसेसह जात असताना एक पांढऱ्या रंगाच्या रेनाल्ड कॉप्टर वाहन क्रमांक एम. एच. ३३ व्ही ४३३३ चा चालक आशीष माणिक एंचिलवार, रा. देऊळगाव, ता. आरमोरी याने त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन हयगयीने व भरधाव वेगाने व रस्त्याच्या परीस्थितीकडे लक्ष न देता निष्काळजीपणे वाहन चालवून वाहनास जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, मोटरसायकलवरील दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. मृताचे नातेवाइक कार्तिक श्रीकृष्ण कुनघाडकर ( वय २०) रा. तळोधी मोकासा ता. चामोर्शी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दीपक मोहीते प्रकरणाची चौकशी करत आहेत.
—————————————–









