३ जहाल माओवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

86

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. १४ : शासनाने एकूण ३८ लाख रुपये बक्षीस जाहीर केलेल्या ३ जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दल व केंद्रीय राखीव पोलिस दलापुढे शुक्रवार (ता. १४) आत्मसमर्पण पत्करली. विक्रम ऊर्फ मंगलसिंग ऊर्फ संदीप सहागू तुलावी, (सीवायपीसी/डिव्हीसीएम/उप-कमांडर, कंपनी क्र. १०), ( वय ४०) रा. गुर्रेकसा, ता. धानोरा, जि. गडचिरोली, नीलाबाई ऊर्फ अनुसया बंडू ऊईके, (डिव्हिसीएम, कुतुल दलम, माड डिव्हीजन) ( वय ५५) रा. मेडपल्ली, ता. भामरागड, जि. गडचिरोली, वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो राजू हिडामी, (पी.पी.सी.एम./सी-सेक्शन कमांडर, कंपनी क्र. १०) ( वय ३६) रा. गुर्रेकसा, ता. धानोरा, जि. गडचिरोली, अशी आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची नावे आहेत.

विक्रम ऊर्फ मंगलसिंग ऊर्फ संदिप सहागु तुलावी २००४ मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन २००५ पर्यंत काम केले. २००६ मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन टिपागड दलममध्ये काम केले. २००६ मध्ये धानोरा दलममध्ये कमांडर पदावर पदोन्नती होऊन सन २००७ पर्यंत काम केले. २००७ मध्ये माडमधील कुतुल एरीयामध्ये वैद्यकीय कामकाजाचे प्रशिक्षण घेतले. २००८ मध्ये कंपनी क्र.४ मध्ये एसीएम/पीपीसीएम पदावर बदली होऊन सन २०१० पर्यंत डॉक्टर म्हणून काम केले. २०१० मध्ये कंपनी क्र. १० मध्ये उप-कमांडर (सीवायपीसी) पदावर पदोन्नती होऊन सन २०१२ पर्यंत काम केले. २०१२ मध्ये डीके झोन डॉक्टर टिममध्ये कमांडर पदावर काम केले. २०१२ ते २०१५ पर्यंत बटालीयन क्र. २ मध्ये सीवायपीसी पदावर काम केले. २०१५ ते २०१७ पर्यंत, डीके झोन डॉक्टर टिममध्ये सीवायपीसी/डिव्हिसीएम पदावर काम केले. २०१७ ते २०२२ पर्यंत, कंपनी क्र. १ मध्ये सीवायपीसी/कमांडर तसेच सचिव पदावर काम केले. २०२२ पासून आतापर्यंत कंपनी क्र. १० मध्ये सीवायपीसी/डिव्हिसीएम/उप-कमांडर पदावर काम केले. नीलाबाई ऊर्फ अनुसया बंडू ऊईके हिने डिसेंबर १९८८ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन १९९१ पर्यंत काम केले. १९९१ मध्ये कोहलीबेडा दलम (उत्तर बस्तर डिव्हीजन (छत्तीसगड)) मध्ये बदली होऊन १९९६ पर्यंत सदस्य पदावर काम केले. १९९६ साली कोहलीबेडा दलममध्ये एसीएम (एरीया कमिटी मेंबर) पदावर पदोन्नती होऊन सन २००२ पर्यंत काम केले. मे २००२ मध्ये माड डिव्हीजनमधील कोहकामेट्टा दलममध्ये बदली होऊन २००३ पर्यंत एसीएम पदावर काम केले. २००३ मध्ये कमांडर पदावर पदोन्नती होऊन कोहकामेट्टा महिला दलम या नवीन दलममध्ये २००५ पर्यंत काम केले. २००५ पासून २०११ पर्यंत कुतूल-कोहकामेट्टा एरीया कमिटीमध्ये नवीन सदस्यांना माओवादी चळवळीची माहिती देण्याचे व नक्षल साहित्यांच्या भाषांतराचे काम केले. २०१२ मध्ये कोहकामेट्टा दलममध्ये डिव्हिसीएम पदावर पदोन्नती होऊन २०१५ पर्यंत काम केले. २०१५ मध्ये मोपोस (मोबाईल पॉलीटीकल स्कुल) मध्ये बदली होऊन २०१८ पर्यंत काम केले. २०१८ मध्ये, ऊसेवाडा टेलर टिममध्ये बदली होऊन २०२५ पर्यंत काम केले. जानेवारी २०२५ पासून कुतूल एरीया कमिटीतील टेलर टिममध्ये बदली होऊन डिव्हिसीएम पदावर आजपर्यंत काम केले. वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो राजु हिडामी २००८ मध्ये मौजा गुर्रेकसा गावातील केएएमएस (क्रांतीकारी आदिवासी महिला संघटन) मध्ये सदस्य पदावर भरती होऊन २००९ पर्यंत काम केले. मे २००९ टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन ऑक्टोंबर २००९ पर्यंत काम केले. ऑक्टोंबर २००९ मध्ये कंपनी क्र. ४ मध्ये बदली होऊन सन २०१० पर्यंत काम केले. जुलै २०१० मध्ये कंपनी क्र. १० मध्ये बदली होऊन जानेवारी २०१२ पर्यंत काम केले. जानेवारी २०१२ मध्ये डीके झोन डॉक्टर टिममध्ये बदली होऊन काम केले. मार्च २०१२ मध्ये माड डिव्हीजन मधील बटालियन क्र. २ मध्ये बदली होऊन सन २०१५ पर्यंत काम केले. २०१५ मध्ये डिके झोन डॉक्टर टिममध्ये बदली होऊन सन २०१७ पर्यंत काम केले. २०१७ मध्ये डिके झोन टेलर टिममध्ये बदली होऊन सन २०२३ पर्यंत सदस्य पदावर काम केले. शासनाने २००५ पासून जाहीर केलेल्या शरणागती योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण ६९९ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलापुढे आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिस विभागाने दिली आहे.