महाशिवरात्रीनिमित्त विश्वहिंदू परिषद, आधारविश्व फाउंडेशनद्वारे भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप

106

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २८ : महाशिवरात्रीनिमित्त २६ फेब्रवारी २०२५ रोजी विश्वहिंदू परिषद व आधारविश्व फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. जवळजवळ ५०० च्यावर भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी गडचिरोली विश्वहिंदू परिषदेचे अध्यक्ष सुशील हिंगे, आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे, अनुप असाटी, बोधलकर, विनय मडावी, आयूष न्यालेवार,सुनीता आलेवार, सीमा कन्नमवार, अनिल तिडके, अनिल पोहणकर, रोशन संतोषवार, अलका पोहणकर, अंजली देशमुख, प्रतिमा सोनवणे व विश्व हिंदू परिषदेचे अन्य पदाधिकारी तसेच आधारविश्व फाउंडेशनच्या सदस्य उपस्थित होत्या.