लाहेरी उप पोलिस स्टेशन येथे जनजागरण मेळावा

70

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २६ : भामरागड तालुक्यातील लाहेरी उप पोलिस स्टेशनच्या हद्दीतली नागरिकांसाठी गुरुवार (ता. २७) सकाळी १० वाजता जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने भामरागड उपविभागाअंतर्गत लाहेरी पोलिस स्टेशन येथे आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीआरपीएफ ३७ बटालियनचे पोलिस निरीक्षक भुमेश्वर गौत्रे राहतील. तसेच आरोग्य विभागाचे डाॅ. भोकरे, लाहेरीच्या सरपंच राजेश्वरी बोगामी, ग्रामसेवक अश्विन मोरे यांची प्रमुख उपस्थिती राहिल. या जनजागरण मेळाव्यात आधार कार्ड दुरुस्ती, नवीन नोंदणी, आभा कार्ड, पॅन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी, जात व अधिवास प्रमाणपत्र आदी कागदपत्रे मिळवून देण्यात येतील. तसेच या जनजागरण मेळाव्यात धान चुरणे मशिन, पाणी साठवण्याची मोठी टाकी, हाॅलीबाॅल, हॅंडबाॅल नेट, क्रिकेटचे साहित्य वितरीत करण्यात येईल. याशिवाय नागरिकांची आरोग्य तपासणी करून मोफत औषध वितरण करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.