Home Gadchiroli आष्टी पोलिसांनी आवळल्या तंबाखू तस्करांच्या मुसक्या

आष्टी पोलिसांनी आवळल्या तंबाखू तस्करांच्या मुसक्या

192

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

आष्टी, ता. २६ : चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहनाच्या साहाय्याने सुगंधी तंबाखूची तस्करी करणारे तस्कर पकडत आष्टी पोलिसांनी मंगळवार २५ मार्च रोजी त्यांचा डाव उधळवून लावला आहे. पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून या कारवाईत १९ हजार ८०० रुपयांच्या सुगंधित तंबाखूसह, वाहन असा एकूण १० लाख १९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी याप्रकरणी श्रीकांत नंदकुमार आकुलवार (वय ३८) रा. देवापूर वाॅर्ड, ता. गडचिरोली, पराग अरविंद रामटेके (वय ३८) रा. नागभिड जि. चंद्रपूर, हेमंत देविलाल चव्हाण (वय ३८) रा. अहेरी तिघांना अटक केली आहे. आष्टी-चामोर्शी मार्गावर वाहनातून सुगंधित तंबाखूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने कोनसरी गावातील एका दुकानासमोर सापळा रचला एमएच १९ बीयू-७८६० क्रमांकाचे वाहन संशयास्पदरित्या येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता वाहनात १९ हजार ८०० रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू आढळून आला. यावेळी सुगंधित तंबाखूसह चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.