ग्लोबल गडचिरोली न्यूज,
अहेरी, ता. १८ : इंस्टाग्रामवरून झालेल्या ओळखीचा फायदा घेत युवतीसोबत जबरदस्ती लैंगिक संबंध प्रस्थापित करून तिचे अश्लिल फोटो समाजमाध्यमांवर पोस्ट करणाऱ्या आरोपीस अहेरी पोलिसांनी दिल्ली येथून जेरबंद केले आहे. अहेरी न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शहानवाज मलिक (वय २२)रा.मेरठ (उत्तर प्रदेश ) असे आरोपीचे नाव आहे.
जून २०२३ मध्ये इंस्टाग्रामवर युवती व आरोपीची ओळख झाली. काही दिवसांनी आरोपी हा सेंट्रींगच्या कामासाठी अहेरी येथे आला. ११ जून २०२३ ला आरोपी व तरुणीची पहिली भेट झाली. त्यानतर आरोपी मलिकने युवतीला जुलै २०२३ मध्ये खोलीवर बोलवून तिच्यासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले व तिचे मोबाईलमध्ये फोटो काढले. तसेच त्यानंतर अनेकवेळा आरोपीने तरुणीला त्याच्या रूमवर बोलवून मी तुझे फोटो व्हायरल करेल असे म्हणून बरेच वेळेस तिच्या अल्पवयाचा फायदा घेऊन जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तिला अनेक वेळा व्हिडिओ कॉल करून तुझे कपडे काढून तुला मला बघायचे आहे असे म्हणुन तिचे व्हिडिओ तयार केले. तरुणीने आरोपीला माझे मामा माझ्यासाठी मुलगा बघत आहे असे सांगितले असता तुझे कोणासोबतही लग्न होऊ देणार नाही असे म्हणून मी तुला मारून टाकेल, अशी धमकी देत होता. फिर्यादीने आरोपीला मला लग्नासाठी मुलगा बघायला येणार आहे असे सांगितले असता आरोपीने फिर्यादीचे इंस्टाग्राम व फेसबुकवर कपडे काढलेले व्हिडीओ अपलोड करून तिची बदनामी केली. तरुणीच्या तक्रारीवरून अहेरी पोलिसांनी आरोपीचा माग घेऊन दिल्ली येथून त्याला ताब्यात घेतले. अहेरी न्यायालयात त्याला हजर केले असता २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अहेरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक स्वप्नील इज्जपवार तपासी अधिकारी म्हणून काम बघत आहेत.










