विश्व हिंदू परीषदेच्या वतीने रक्तदान शिबिर

131

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २५ : विश्व हिंदू परिषद गडचिरोलीतर्फे स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले.

गडचिरोलीमधील लोकांनी बहुसंख्येने रक्तदान केले, या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुशील हिंगे, आधार विश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे, विहिंपचे जिल्हा सहमंत्री रमेश बोधलकर, गडचिरोली प्रखंड मंत्री अनुप असाटी, मातृशक्तीच्या जिल्हा संयोजिका योगीता दशमुखे, जिल्हा सहसंयोजिका विद्या जवळे, सह संयोजिका अर्चना कत्रोजवार, वर्षा शेडमाके उपस्थित होत्या, या कार्यक्रमाचे नियोजन आयुष न्यालेवार यांनी केले, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते, शिबिरात २० लोकांनी रक्तदान केले.विश्व् हिंदू परिषदेमार्फत रक्तदात्यांना केळी व बिस्कीट देण्यात आले. सर्व रक्तदात्यांना विश्व हिंदू परिषदेतर्फे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. तसेच विश्व हिंदू परीषदेने रक् दान केल्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.

———————————–