-खासदार अशोक नेते यांची मुलचेरा व चामोर्शी तालुक्यातील विविध ठिकाणी च्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व हरे राम हरे कृष्णा या अमृतलीला ला सदिच्छा भेट.

270

गडचिरोली,

मुलचेरा तालुक्यातील मौजा-अडपली येथे श्री.श्री. हरिचाँद ठाकूर यांना वंदन करून हरी बोल..अशा या मधुरमय भक्तीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

तसेच चामोर्शी तालुक्यातील मौजा- आनंदग्राम व

इस्कॉन येथे आयोजित श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ व हरे राम हरे कृष्णा या अमृतलीला कृष्ण भक्ती अशा या कार्यक्रमाला खासदार अशोक ‌नेते यांनी सदिच्छा भेट दिली.खासदार अशोक नेते यांनी या कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी मोठया आनंद उत्साहाने गावातील नागरिक एकत्रित येऊन भक्ती भावनेने पुजा अर्चना करतात हरे राम, हरे कृष्णा व हरीबोल तसेच श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते अशा धार्मिक कार्यक्रमाची आज गरज असून या धार्मिक कार्यक्रमामुळे आचार, विचार ,संस्काराची निर्मिती होते.असे प्रतिपादन यावेळी खा.नेते यांनी केले.

 

यावेळी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते,जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे,

भाजपा तालुकाध्यक्ष संजय सरकार,कामगार आघाडीचे गोवर्धन चव्हाण, तालुका महामंत्री सुभाष गणपती,तालुका महामंत्री विजय बिशवास,विधान बेद्य, परिमल सरकार,अशित राँय,शांती राँय,विशरजीत मंडल,शुशंकर मंडल,गौर बिशवास, तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थिती होते.