गडचिरोलीच्या महिला खेळाडू राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी रवाना

109

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २९ : गडचिरोली जिल्ह्यातील महिला व पुरुष अशा १२ खेळाडूंची निवड संभाजीनगर येथे होणाऱ्या सहाव्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी झाली असून त्यांना माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत या खेळाडूंनी ट्रेडीशनल, फाॅरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग, ट्वीस्टिंग, हॅण्ड बॅलन्स, लेग बॅलन्स, आर्टिस्टिक सिंगल व पेअर, रिदमिक पेअर आणि सुपाइन या प्रकारांत आपले कौशल्य सादर केले होते. माजी खासदार डॉ. नेते यांनी सर्व खेळाडूंना आशीर्वाद देत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, नगरसेवक आशीष पिपरे, मोडक, योग शिक्षक निकोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

——————————————