गडचिरोली शहरात आयुर्वेदिक पंचकर्म रुग्णालयाचे थाटात उदघाटन..

276

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ८ : शहरातील आशीर्वादनगर शिवाजी विज्ञान महाविद्यालय रोडवर डॉ.प्राची विनय साळवे/छेनिया यांचे आयुर्विज्ञान (प्राचिन) आयुर्वेदिक रुग्णालय व पंचकर्म संशोधन केंद्राचे उद्घाटन साळवे व छेनिया परिवारातील ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.

या रुग्णालयात सर्व आजारांवर तसेच विशेष म्हणजे केशविकार व त्वचाविकारांवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार व पंचकर्म थेरपीद्वारा तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांकडून उपचार केला जाणार आहे. सोबत संपूर्ण आयुर्वेदिक औषधीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी या विशेष आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आव्हान करण्यात आले आहे.